धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पूजन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण केले.
यावेळी विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ. विक्रम शिंदे, प्रा. सचिन बस्सयै, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. सुयोग अमृतराव, वसंतरावजी काळे स्वाभिमान शिक्षण योजना समन्वयक डॉ. गोविंद कोकणे, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. जितेंद्र कुलकर्णी शिक्षणशास्त्र विभागातील डॉ. महेश्वर कळलावे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मेघश्याम पाटील, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशन हावळ, कक्ष अधिकारी विद्याधर गुरव, ग्रंथालय सहाय्यक तुकाराम हराळकर, मल्लिनाथ लामजणे, वरिष्ठ सहाय्यक विश्वास कांबळे, शिवाजी माने, संजय जाधव, श्रीकांत सोवितकर, धनराज सोमवंशी, कर्मचारी अशोक लोंढे, सिद्धेश्वर नेटके, राहुल कामटे, संतोष शिंदे, हेमंत रसाळ इ. उपस्थित होते.