तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मराठी विभाग प्रमुख प्रा राजा जगताप यांनी वरील प्रतिपादन केले.

पुढे ते म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव ते मुंबई पर्यंतचा प्रवास हा मराठी साहित्य विश्वालाच नव्हे तर जागतिक साहित्य विश्वाला कलाटणी देणारा ठरला, अण्णाभाऊ साठे यांचे अस्सल ग्रामीण साहित्य हे अन्य साहित्यकारंना दिशा दर्शक यासाठी होते की,ते साहित्य मराठी मातितुन उगवलेले साहित्य आहे,त्यांचे लेखन सामाजिक व राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर अवलंबून आहे ते मार्क्सवादी व आंबेडकरवादी प्रवृत्तिचे होते, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या पोवाड्यातुन जनसामान्यांच्या मनात रुजविण्याचे काम त्यांनी केले.त्यांचे फकिरा सारखे साहित्य हे काळजाला पिळ देणारे आहे,वैजयंता,वारणेचा वाघ,अशी ही साताऱ्याची तऱ्हा त्यांचे हे साहित्य अनुभवांचे साहित्य आहे,त्यांच्या लेखणीतून क्रूर सत्याचे दर्शन घडते,सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना प्रतिभेचं देणं लाभलं होतं, मराठी साहित्य हे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याशिवाय पूर्ण होत नाही ही बाब आपण लक्षात ठेवणं गरजेची आहे असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.अध्यक्षीय समापनात प्र प्राचार्य डॉ जीवन पवार म्हणाले की,1 ऑगस्ट 1920 ला अण्णाभाऊंचा जन्म झाला,व 1 ऑगस्ट 1920 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन ही एक विशेष बाब आहे, लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरुद्ध जहालवादी विचारांचे समर्थन केले तर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामधुन विद्रोही विचारधारा प्रकट होते,समाजाला एक सूत्रता देण्याचे कार्य लोकमान्यांनी केले तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंची महत्वाची भूमिका आहे.लोकमान्य टिळकांनी आपल्या वृतपत्रातुन अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देण्याचे कार्य केले जनमाणसाला स्वातंत्र्य चळवळीसाठी जागृत व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लोकमान्य टिळकांनी केले .असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ मंत्री आर आडे यांनी केले,सदर प्रसंगी वरीष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण यांनी मानले.

 
Top