तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे साथरोगाचा फैलाव झाला असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन पाण्यासाठयाची तपासणी करून अबेट टाकून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर येथे कोंदट वातावरण असल्याने ताप, सर्दी,खोकला या रोगाचे प्रमाण वाढते असून रुग्न ग्रामीण रुग्णालय व खाजगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने साथरोगाचा फैलाव होऊ नये म्हणून तेर येथे घरोघरी जाऊन जागजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्याम पाटील , डॉ. प्राची माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी आरोग्य सहाय्यक मानाजी नागलबोणे, आरोग्यसेवक संतोष खुणे,प्रकाश शिरसाट,परीचारीका शर्मिला ठवरे, आशा पर्यवेक्षिका संगिता डोलारे,आशा स्वयंसेविका राणी शिराळ,कविता आंधळे,दैवशाला भोरे,पुष्पा झिंजे सुषमा सरवदे,लतिका कोरबु,राणी वाघ,रेश्मा नान्नजकर ,रेखा पागरकर,स्वाती पवार,मिरा गाढवे,पोर्णिमा झाडे घरोघरी जाऊन पाण्याचे साठे तपासून निर्जंतुकीकरण होण्यासाठी अबेट पाण्यात टाकत आहेत.
नागरिकांनी दर शनिवारी कोरडा दिवस पाळावा, परीसर स्वच्छ ठेवावा, पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच प्यावे,शिळे अन्न खाऊ नये, खोकला,ताप, सर्दी अशी लक्षणे दिसल्यास त्वरित दवाखान्यात उपचार घ्यावेत -मानाजी नागलबोणे, प्रभारी आरोग्य सहाय्यक, आरोग्य उपकेंद्र,तेर.