तेर (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून 30 वर्षांची प्रलंबित मागणी मार्गी लागल्यामुळे तेर येथील मातंग समाजाच्या वतीने 2 ऑगष्टला शिंगोली येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशीच राज्य सरकारने मोठा ऐतिहासिक निर्णय दिला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा धाराशिव येथे पूर्ण आकृती पुतळा बसविण्यासाठी 1 एकर जागा मंजूर केली आहे. याबद्दल तेर येथील मातंग समाजाच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विलास रसाळ,  प्रज्योत रसाळ, रंगनाथ लोमटे,रवी शिंदे, शुभम शिंदे, अमोल रसाळ, बाबा रसाळ,निखिल खंदारे,विशाल पेठे, प्रफुल्ल रसाळ, आदेश कांबळे व मातंग समाज बांधव उपस्थित होते.

 
Top