परंडा (प्रतिनिधी)- मुस्लिम समाजाच्या विकासासाठी अल्पसंख्याक विभागाने मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) ची स्थापना करावी व त्यास निधी उपलब्ध करून द्यावा. या मागणीचे निवेदन परंडा तहसीलदार घनश्याम अडसूळ यांना दिनांक 5 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुस्लिम समाजा पुरोगामी महाराष्ट्रात मागासलेला आहे हे मेहमदुर रहमान समितीच्या अहवालातून सिद्ध झाले आहे. मुस्लिम समाजाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक विकास साठी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. परंतु वित्त विभागाने ते नाकारले आहे. राज्यातील मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्टी ही संस्था स्थापन करून त्यास निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव नशीर शहाबर्फीवाले, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, शहराध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, गनी हावरे, शहरे काजी जफर अली अश्फाक काझी, डॉ.नवनाथ वाघमोडे, घनश्याम शिंदे, नंदु शिंदे, विश्वनाथ खुळे, खय्युंम तुटके, झुल्फिकार काझी, सदातली काझी, जिशान शहाबर्फीवाले, जहीर शहाबर्फीवाले,एजाज शहाबर्फीवाले,रुपेश बनसोडे, सकलेन शहाबर्फीवाले, गौस चांदपाशा जिनेरी, नियामत हांनूरे, मोहम्मद अली जिनेरी, गणेश मदने ऋषिकेश फल्ले,आकीब तांबोळी, राहुल तांबे, प्रणव कांबळे, अभिजीत बनसोडे, सिद्धार्थ चव्हाण, अविनाश चव्हाण, दिनकर ताकमोडे यांच्या सह्या आहेत.