भूम (प्रतिनिधी)- भूम येथील तहसील कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात भूम परंडा वाशी शासकीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष गौतम लटके यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये तिन्ही तालुक्यातील या योजनेसाठी ऑनलाइन, ऑफलाइन आलेल्या अर्जा संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यामध्ये भूम परंडा वाशी तिन्ही तालुक्यातून 25900 अर्ज मंजूर करण्यात आले. भूम तालुक्यामधून ऑनलाइन 7461 अर्ज आले असून ऑफलाइन 16000 अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑफलाइन आलेले अर्ज ग्रामपंचायत स्तरावर ऑनलाइन करण्यासाठी देण्यात आले आहेत. ऑनलाइन आलेल्या अर्जापैकी 6608 मंजूर करण्यात आले असून तात्पुरत्या कारणाने 900 अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहे. या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, भूमचे तहसीलदार जयवंत पाटील, परंडाची तहसीलदार घनश्याम अडसूळ, वाशीचे तहसीलदार राजेश लांडगे, भूम नगरपरिषद च्या मुख्याधिकारी शैला डाके, परंडा नगरपरिषद मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली, गट विकास अधिकारी आर व्ही चकोर, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण कमिटीचे भूम तालुका सदस्य ॲड. रामराजे साळुंखे, अश्विनकुमार कांबळे, आदी यावेळी उपस्थित होते. लाडकी बहीणचे साईड बंद असल्यामुळे त्यांच्या स्तरावर ऑफलाइन पद्धतीने गोळा करून घेतलेले कागदपत्रे ऑनलाईन करण्यासाठी पुन्हा लाडक्या बहिणीच्या हार्दिक स्वागत करण्यात आले आहे. असे बरेचसे तालुक्यामध्ये गावे आहे.