भूम (प्रतिनिधी)- मराठवाडा लोककला विकास मंडळ व वृद्ध साहित्यिक कलाकार संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या लोककलावंत मेळावा - सांस्कृतिक कला महोत्सव स्पर्धेमध्ये आराधी प्रकारात आरसोली व अनिता काळे आराधी मंडळांनी तर भजन प्रकारात वीर गल्ली विठ्ठल रुक्मिणी व सोनगिरी मंडळाने विभागून प्रथम क्रमांक मिळवला, त्यांना कार्यक्रम स्थळी बक्षीस घेऊन सन्मानित करण्यात आले .
शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये मराठवाडा लोककला विकास मंडळ व वृद्ध साहित्यिक कलाकार संघटनेच्यावतीने लोक कलावंत मेळावा - संस्कृत कला महोत्सव - लोककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कलावंतांनी उपस्थिती लावली होती .
स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, वारकरी साहित्य परिषदेच्या भूम तालुका अध्यक्ष मंदाताई बोराडे, वृद्ध कलाकार मानधन निवड समिती सदस्य शंकरराव खामकर, शशिकला गुंजाळ , लावणी प्रकारात साता समुद्रापार कलेची अदाकारी करून जपान, थायलंड मलेशीया सारख्या देशात प्रथम क्रमांक मिळवणारी स्नेहा दुधाळ , गायत्री दिनेश तिवारी परंडा यांचेसह अनेकांची उपस्थिती होती .
सकाळी दहा वाजता सुरू झालेली कला महोत्सवाची स्पर्धा सायंकाळपर्यंत चालू होती, या स्पर्धेत तालुक्यातील शेकडो कलाकारांनी सुरमधून आपली कला सादर करून कला रसिक आणि मूल्यांकन करणाऱ्या परीक्षक व आयोजकांचे लक्ष वेधून घेतले, या स्पर्धेतील भारुड, पोतराज, आराधी, भजनी मंडळाच्या गायकांनी चांगलाच सूर धरला होता. स्पर्धेतील उत्कृष्ठ प्रथम भजनी मंडळास 5001, द्वितीय 3001 , तृतीय 2001 व उत्कृष्ट आराधी मंडळसाठीही अशाच प्रकारची बक्षीस स्पर्धा समारोप प्रसंगी स्वतंत्ररित्या देण्यात आले.
कार्यक्रमाच्या दरम्यान लोककलेतील आराधी , पोवाडे, वासुदेव, पांगुळ अशी काही कला प्रकार मोबाईल प्रकारांमध्ये बंदिस्त होत असल्यामुळे ही कला धोक्यात आल्याची खंत ही व्यक्त केली, संपूर्ण स्पर्धेचं कलाकाराच्या कलेच् मूल्यांकन , गुणांकन कला क्षेत्रातील अभ्यासक ह , भ, प, धर्मदूत अरुण शाळू महाराज व सुधीर खोचरे महाराज यांनी केले .
कार्यक्रमासाठी वृद्ध, साहित्यिक कलाकार संघटनेचे पदाधिकारी व सर्जेराव इंदलकर, महादेव राजाराम जाधव, गुंजाळ महाराज यांच्या सहकार्याने मोठ परिश्रम घेतले.