भूम (प्रतिनिधी)- चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशावर चांद्रयान-3 लँडिंगच्या यशाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा केला जातो.

 अवकाश व अवकाश संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असणार कुतूहल व त्याची आवड निर्माण व्हावी यासाठी आज राष्ट्रीय अवकाश दिन साजरा केला. शिक्षकांनी कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून अंतराळवीर चा गणवेश शिक्षिका दीपिका टकले यांनी तर अंतराळाची प्रतिकृती शिक्षिका भाग्यश्री डांगे, मेघा सुपेकर व सेजल सुरवसे यांनी तयार केली. विद्यार्थ्यांना अंतराळाची माहिती प्रात्यक्षिकासह शिक्षकांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा म्हेत्रे व अरुणा बोत्रे यांनी परिश्रम केले.


 
Top