धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार व सपोनि कविता मुसळे यांना गुप्त बातबीदारामार्फत माहिती मिळाली की,परंडा शहरातील शहाजी माळी याने त्याचे व्हाटसअप प्रोफाईल वरती पिस्टल हातात धरुन फोटो ठेवलेला आहे. सदरील फोटो पाहून सदरील तरुण हा शहाजी माळी आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने यावर परंडा पोलीस ठाण्याचे पथकाने सदर ठिकाणी जावून नमुद इसमास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला लावलेली गावठी पिस्टल(बंदुक) मिळून आली. यावर पथकाने पंचासमक्ष त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील गावठी पिस्टल जप्त करुन आरोपी नामे- शहाजी माळी, ऋषीकेश गायकवाड, ओंकार सुतार यांचेविरुध्द पोलीस ठाणे परंडा येथे गुरनं 174/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25, 3(5) भारतीय न्याय सहिंता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी भुम श्री. गौरीप्रसाद हिरेमठ यांचे मार्गदर्शनाखाली परंडा  पोलीस ठाण्याचे चे पोलीस निरीक्षक श्री विनोद ईज्जपवार, सपोनि कविता मुसळे, मपोह/ जिज्ञासा पायाळे, पोह/फिरोज शेख नितीन गुंडाळे, पोअं/भांगे, राहुल खताळ, रजत चव्हाण, साधू शेवाळे, गायकवाड, काकडे, कोळेकर यांचे पथकाने केली आहे.

 
Top