धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील रहिवाशी व मुंबई येथे प्राक्टिस करीत असलेले ॲड. अमित मुंडे यांची ईडीचे वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईत सरकारी लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतलेले ॲड. मुंडे यांनी मुंबई विद्यापीठात गुन्हेगारी यामध्ये कायद्याची पदवीत्तर पदवी मिळवली. त्यांनी आपली वकीली मुंबईत सुरू केली. अभ्यासू असलेले ॲड. अमित मुंडे यांची यापूर्वी सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी, रेल्वे आदी विभागाचे सरकारी वकील म्हणून काम केले आहे. जीएनपीटी टर्मिनलमध्ये सापडलेल्या 1 हजार करोड ड्रग्स प्रकरणी ॲड. मुंडे यांनी गुन्हेगारांच्या विरोधात जोरदार बाजू मांडली होती. फिल्म निर्माते व चित्रपट क्षेत्रातील काही आयकर चोरीचे प्रकरणे ॲड. मुंडे बरेच गाजवले.