धाराशिव (प्रतिनिधी)-बंजारा / लमाण तांड्याला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणे, तांड्याची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे तथा सर्वंकष विकास करत बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकारने संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून तांड्यांचा बृहत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. या योजनेमुळे समाजाच्या विकासाचे एक नवे पर्व सुरू होणार असून समन्वयाने विकास आराखडा तयार करण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी बंजारा समाज बांधवांशी संवाद साधताना केले.

बंजारा/ लमाण समाज बांधवांसह या समितीवर निवड करण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांनी आज आ. राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेवून शासनाचे आभार व्यक्त केले, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या गठीत केल्या असून या समित्यांवर प्रत्येकी दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये श्री विलास राठोड व राणीताई राठोड यांची तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीवर अतुल राठोड व संतोष चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यात व मुख्यतः तुळजापूर  तथा उमरगा तालुक्यामध्ये अनेक तांडे असून स्वतंत्र महसुली दर्जा व ग्रामपंचायत नसल्याने येथे विकास कामे करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे तांड्यांच्या विकासासाठी स्वतंत्र योजनेची गरज विचारात घेऊन महायुती सरकारने संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून तांड्याला महसुली गावाचा दर्जा देणे, स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे, तांडा घोषित करणे, गावठाण जाहीर करणे, या बाबी करण्यात येणार असून प्रत्येक तांड्याचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्राप्त आराखड्या मधून कामांची गरज व प्रधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे.

यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य  विद्यानंद राठोड, नळदुर्ग नगरसेवक  निरंजन राठोड, धाराशिव बाजार समितीचे  उपसभापती  शेषेराव चव्हाण, प्रवीण पवार,  जळकोटवाडी  माजी सरपंच वसंत पवार, राहुल राठोड, माजी नगरसेवक श्रीमती छमाबाई राठोड,  अलियाबाद उपसरपंच अमृता चव्हाण, घंदोरा सरपंच श्रीमती बबिता राठोड,अनिल पवार, जकणी तांडा सरपंच शिवाजी जाधव, बाळू जाधव, वसंत जाधव, सतीश राठोड, दत्ता राठोड, दिनेश राठोड, श्रीमंत राठोड, महेश चव्हाण, अनिल राठोड, विलास सुरवसे,  संजय चव्हाण,  तुकाराम चव्हाण,  देविदास राठोड, प्रभाकर चव्हाण, तुकाराम राठोड, पिंटू राठोड, ज्ञानदेव राठोड यांच्यासह  बंजारा समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top