तुळजापूर (प्रतिनिधी)- बदलापूर येथे दोन चिमुकल्यांन वर करण्यात आलेल्या अत्याचार निषेधार्थ महाविकास आघाडी तर्फे  छञपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर  शनिवार दि. 25 ऑगस्ट रोजी तोंडावर  काळ्या पट्या बांधुन शाषणाचा निषेध करुन आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत आंदोलन करण्यात आले.

यावेळी शाषण व गृहखात्याच्या अपयशा मुळे  छञपती शिवरायांच्या महाराष्ट्रात न शोभणारी  निंदणीय  घटना घडली असुन याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे यावेळी बोलताना विविध पक्षाचे पदाधिकारी म्हणाले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष. धैर्यशील पाटील, माजी बांधकाम सभापती व मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन मुकुंद डोंगरे, शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम,  काँग्रेसचे युवक नेते ऋषी  मगर, खरेदी विक्री संघाचे सभापती सुनील जाधव, राहुल खपले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमर  चोपदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय काका पाटील, गणेश ननवरे, शहाजी ननवरे, समाधान देवगुंडे, संजय जाधव, बापूसाहेब नाईकवाडी,नवनाथ जगताप, अनमोल साळुंके, अमोल जाधव, सागर इंगळे,अर्जुन साळुंके,  प्रदीप इंगळे,चेतन बंडगर,कारभारी, बाळासाहेब शिंदे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते.

 
Top