तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 66 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला, याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज फडकावण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ.मंत्री आर आडे यांचे उच्चशिक्षण व आजचा तरुण या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. 

यावेळी ते म्हणाले की, भारतीय सामाजाच्या विकासाचे प्रथम चरण हे तरुण आहेत.तरुणांना आजच्या काळात उच्चशिक्षण याबरोबरच उच्च कोटीचे संस्कार असणे गरजेचे आहे,कारण देशाचा विकास हा तरुणांच्या सकारात्मक संस्कारावर होत असतो.आपले ध्येय निश्चित करुनच महाविद्यालयीन शिक्षणामध्ये विषय निवडणे गरजेचे आहे,उच्चशिक्षणामुळेच तरुणांचे जीवन संस्कारक्षम होईल, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये फक्त रोजगार निर्मिती करणारे शिक्षण अंतर्भूत नाही तर समाजाला संस्कारित करणारे अभ्यासक्रम देखील आलेले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.अध्यक्षीय समापनाप्रसंगी प्र प्राचार्य डॉ जीवन पवार म्हणाले की,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे केवळ संस्थेचे ब्रीद नसून ते भारतीय शिक्षणाचे महामंत्र आहे ,आपण कांहीं बाबी तात्विक रित्या समजून घेणे आवश्यक आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जेव्हा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली या पाठीमागे शिक्षणाबरोबरच संस्कारांचा देखील एक आधार आहे, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या कडे जो मानवतावाद होता तो आजही कायम आहे, थोरामोठ्यांच्या आदर्शावर आणि संस्कारावरच आजच्या तरुण पीढिने  पुढे जाणे गरजेचे आहे,कारण हाच एकमेव असा मार्ग आहे ज्यावर प्रवास करुन आपल्या जीवनात आनंदाचे गाव येईल, तरुणांनी वाम मार्गाने न जाता,आपली संस्कृती जपणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले.सदर प्रसंगी डॉ अनंता कस्तुरे,प्रा राजा जगताप, डॉ.सी आर दापके डॉ.नेताजी काळे, डॉ एफ एम तांबोळी डॉ . दयानंद हाके यांच्या सह सर्व शिक्षक व विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाधिकारी प्रा बाळासाहेब कुकडे यांनी मानले.


 
Top