तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील आठवडी बाजारात मुरूम टाकण्याची मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतकडे निवेदनाद्वारे केली होती परंतू ग्रामपंचायतने बाजारात मुरूम टाकला नसल्याने नागरिकांनी ठेकेदारास कर वसुली करू दिली नाही.ग्रामपंचायतने लेखी आश्वासन दिल्यानंतर ठेकेदारास कर वसुली करू दिली.
तेर येथील आठवडी बाजारात अनेक ठिकाणी पावसामुळे चिखल होत असून त्याचा बाजारात जाणाऱ्या नागरीकास त्रास होत असून आठवडी बाजारात ग्रामपंचायत यांनी लवकरात लवकर मुरूम टाकण्यात यावा अन्यथा पुढील आठवड्यात आठवडी बाजारात ठेकेदारास कर वसुली करू दिली जाणार नाही असा इशारा नागरीकानी तेर ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे दिला होता.परंतू ग्रामपंचायत यांनी मुरूम टाकला नसल्याने सोमवार 12 आॅगष्टला तेर येथे आठवडी बाजार असल्याने ठेकेदारास कर वसुली सचिन देवकते, शिवाजी पडुळकर, विठ्ठल कदम यांनी करु दिली नाही.यानंतर तेर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच यांनी सचिन देवकते यांना तेर ग्रामपंचायत कार्यालयाकडे सध्या निधी उपलब्ध नसल्याने आठवडी बाजारात मुरूम टाकला नाही.त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात ग्रामपंचायत कडून आठवडी बाजारात मुरूम टाकण्यात येईल.त्यामुळे आठवडी बाजारातील कर वसुली करण्यास आपणाकडून सहकार्य करावे ही विनंती असे लेखी आश्वासन दिल्यानंतर ठेकेदारास कर वसुली करू देण्यात आली.
तेर ग्रामपंचायत यांनी मुरूम नाही टाकला तर आठवडी बाजारात कर वसुली करू दिली जाणार नाही --सचिन देवकते