धाराशिव (प्रतिनिधी) - अनुसुचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात दि.21 ऑगस्ट रोजी संपुर्ण भारत बंद तू करण्यात आला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा बंद करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना एका नियोजनाद्वारे एससी, एसटी व भिमसैनिकांच्यावतीने दि.20 ऑगस्ट रोजी दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने अनुसुचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे. तसेच या दोन्ही समुदयाला क्रिमिलियरची अट देखील न्यायालयाच्या निर्णयानुसार लावण्यात आलेली आहे.  या निर्णयामुळे संपूर्ण देशातील अनुसुचित जाती जमातीचे विभाजन होऊन समाजात फुट पडत आहे. थर एस.सी, एस.टी आरक्षण संपविण्याचे षडयंत्र केले जात असल्याची भावना एस.सी. एस.टी समुदायांच्या लोकांमध्ये तयार झाली असून लोकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. या निर्णयामुळे दोन्ही समुदायाच्या आस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. एस.सी, एस.टी, समाजाचे आरक्षण व त्यांचे आस्तित्य टिकून राहण्यासाठी व लोकांच्या भावना लक्षात घेऊन आरक्षणाच्या बचावासाठी दि. 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने धाराशिव जिल्हा संपूर्ण बंद करण्यात येत आहे. यावर रिपाई नेते राजाभाऊ ओव्हाळ, बहुजन नेते धनंजय शिंगाडे,  पृथ्वीराज चिलवंत, पुष्पकांत माळाळे, कुंदन वाघमारे, विद्यानंद बनसोडे, पृथ्वीराज वाघमारे, यशपाल गायकवाड, भालचंद्र कठारे, मेसा जानराव, आप्पासाहेब शिरसाट, प्रमोद हावळे, रवी माळाळे आदींसह इतरांच्या सह्या आहेत.


 
Top