तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील भिकार सारोळा येथे संशयित पोलिओ रुग्ण आढळला आहे. भिकार सारोळा येथील एक वर्षाच्या मुलास उपचारासाठी मुरुड येथे नेले होते .परंतु तपासणीत संशयित पोलिओची लक्षणे आढळून आली . या एक वर्षाच्या बाळाचे शौचाचे नमुने मुंबई येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील पाच किलोमीटर परिसरातील भिकार सारोळा ,मोहतरवाडी ,पळसप या ठिकाणी जागजी प्राथमिक आरोग्य केद्राच्या वतीने पाच वर्षाच्या आतील बालकांना घरोघरी जाऊन पल्स पोलिओ डोस पाजण्याजी विशेष मोहिम राबविण्यात आली आहे.