धाराशिव (प्रतिनिधी)-  देशाचे नेते शरदचंद्र पवार, खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा. अमोल कोल्हे यांच्या व महाष्ट्रातील मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा या टॅगलाईनखाली 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून येथून सुरुवात होत आहे. ही यात्रा धाराशिव जिल्ह्यात 13 व 14 ऑगस्ट रोजी येत असल्याने या यात्रेच्या तयारीसाठी धाराशिव येथे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर यांच्या उपस्थितीत धाराशिव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची जिल्हा कार्यालयात गुरुवारी (दि.8) बेठक झाली.

या बेठकीत उपस्थितांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सुचनांची पुढील काळामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्यांनी तयारी करावी, यासाठी गावोगावी भेटी देवून जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन संजय पाटील दुधगावकर, संजय निंबाळकर यांनी केले. या बेठकीसाठी जीवन बरडे, बाळासाहेब कणसे, गौतम क्षिरसागर, रामभाउ पडवळ, नानासाहेब जमदाडे, शशिकांत राठोड, बब्रुवान वाकुरे, बिलाल तांबोळी, वाजीदखान पठाण, अनिल जाधव, रणवीर इंगळे, रणजीत वरपे, गणपत चव्हाण, रमेश गादेकर, आप्पा पडवळ, डा. ताडेकर, रमेश कोळगे, धर्मराज पाटील, मधुकर पाटील, सुभाष नाईकनवरे, अरुण माने, आश्रुबा गाढवे, जितेंद्र घुटे पाटील, मुरारी लोखंडे, भागवतसिंह डोंगरे, संतोष घोरपडे, गणेश गडकर, राजेश मेंढेकर, व्यंकट पाटील, दत्तात्रय सुरवसे, बबन सुरवसे, नामदेव चव्हाण, मनोज घोगरे, सुधाकर माने, विलास वीर, जगदीश शिंदे, बाळासाहेब गुंड, कमलाकर साळूंके, विजय भूमकर, संजू पाटील, अरविंद गाढवे, सतीश पडवळ, शरणाप्पा वागुळे, बाळासाहेब कांबळे, रमेश कोळगे, शिवाजी मते, बालाजी डोंगे, रामेश्वर कासतकर, महोदव खामकर, इकबाल पटेल आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top