धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ॲड. व्यंकटराव गुंड-पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात गाव भेटीच्या माध्यमातून जनसंवाद साधून नागरिकांच्या प्रश्नांची सोडणूक करण्याचा प्रयत्न व तालुक्यातील ऊस लागवड किती? तसेच त्यासाठी देवसिंग (खुर्द) येथील रूपामाता नॅचरल शुगर ऊस उत्पादकांचा ऊस गाळप करण्याची हमी करण्यात येत आहे. या वेळी दिग्विजय इंडस्ट्रीजचे चेअरमन विक्रम सुरवसे व समन्वयक राजेंद्र कापसे उपस्थित होते.
मागील आठ दिवसात कारला, वडगाव लाख, चिकुंद्रा, जळकोट, शिंदगाव, बोरगाव, सलगरा मंडी, वाणेगाव, होणाळा, बारुळ, हगलूर तांडा, मानेवाडी, बसंतवाडी, नंदगाव या गावात बैठकांच्या माध्यमातून थेट जनतेची संवाद साधत आहेत. यावेळी गावातील काही पालकांनी 'रूपामताने आमच्या भागात अजून एखादा उद्योग सुरू करावा. अशी मागणी पालक करत आहेत.