तुळजापूर (प्रतिनिधी)- अयोध्या नगर तुळजापूर येथील ज्या मंडळाने विविध लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवून जिल्ह्यातील आदर्श गणेश मंडळ म्हणून नावलौकिक प्राप्त अशा लोकमान्य युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री शशिकांत मुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत गणेशोत्सव कार्यकारणी 2024 ही जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष नंदकुमार हाजगुडे, उपाध्यक्ष राहुल कणे, सचिव सचिन कोठावळे, कोषाध्यक्ष आण्णासाहेब कणे, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा प्रमुख
अशोक चव्हाण, अजय कांबळे, अजिंक्य नवले, ओंकार मुळे,सौरभ मुळे, किर्तन सेवा नियोजन प्रमुख गजानन भूमकर, बळीराम माने, ज्ञानेश्वर डांगे
मिरवणूक प्रमुख शंकर जाधव, दिनेश क्षिरसागर, महादेव मुळे, शिवाजी कणे, रघु गौड, अभिजित गंजे-पाटील, अक्षय कणे. गणेशोत्सव समन्वय व मार्गदर्शक समिती- विजय नवले (प्रमुख), चंद्रकांत कणे, नारायण मरळ, श्रीरंग लोखंडे, भारत पवार, गणराज पवार, तुकाराम मुळे, रामेश्वर गायकवाड, दिलीप पुजारी, विकास भिरंगे, दीपक पाटील, विजय गाणबोटे, सचिन सगरे,बाळासाहेब रोहिले.
नवनिर्वाचित अध्यक्ष नंदकुमार हाजगुडे यांनी लोकमान्य युवा मंचच्या कार्याची परंपरा अखंडित ठेवून यावर्षी ही आम्ही 1.स्वच्छता अभियान 2.राज्यस्तरीय कराओके खुली गायन स्पर्धा 3.वक्तृत्व स्पर्धा (पर्यावरण संवर्धन व पाण्याचे नियोजन 4.किर्तनसेव 5.आध्यात्मिक व सामाजिक प्रबोधनपर सोंगी-ढोंगी भारूड 6.रांगोळी 7.संगीत खुर्ची 8.लिंबू चमचा 9.महाप्रसाद10.पारंपरिक पध्दतीने टाळ मृदंगाच्या जयघोषात गणेश मिरवणूक असे भरगच्च वरील सर्व समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले असून सर्वच गणेश भक्तांनी कार्यक्रमात मोठ्या संख्येनी सहभाग द्यावा असे आवाहन केले.
लोकमान्य युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत मुळे, उपाध्यक्ष प्रसाद डांगे, सचिव गणेश चादरे यांनी ही परंपरा अखंडीत ठेवून लोकमान्य युवा मंचच्या कार्याचा नावलौकिक वाढवावा यासाठी नवनिर्वाचित गणेशोत्सव कार्यकारणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सर्वच स्तरातून नवनिर्वाचित कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात येत आहे.