धाराशिव (प्रतिनिधी)- कोलकाता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर अत्याचार करुन हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ धाराशिव येथे युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शुक्रवारी रात्री कॅन्डल मार्च काढण्यात आला. या आंदोलनात धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, परिचारिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मध्यवर्ती बस स्थानक या मार्गावरुन हा कॅन्डल मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कॅन्डल प्रज्वलित करुन पीडित डॉक्टर तरुणीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पीडितेस न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी युवासेनेचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे, महिला शिवसेना जिल्हाप्रमुख श्यामलताई वडणे, धाराशिव लोकसभा युवतीसेना विस्तारक स्वाती बोरकर, लातूर युवतीसेना विस्तारक मनीषा वाघमारे, सामाजिक कार्यकर्त्या जिनत प्रधान, सोशल मीडिया राज्य समन्वयक प्रशांत जगताप, युवासेना उपजिल्हाप्रमुख राणा बनसोडे, युवासेना जिल्हा सचिव शिवयोगी चपने, युवासेना जिल्हा सहसचिव अजय धोंगडे, कॉलेज कक्ष जिल्हाप्रमुख अविनाश शेरखाने, उपतालुक़ा प्रमुख राकेश सूर्यवंशी, संदीप गायकवाड, सत्यजीत पडवळ, सुरेश गवळी, युवतीसेना उपजिल्हाप्रमुख भाग्यश्री रणखांब आदीसह विद्यार्थी, शिक्षक, परिचारिका, नागरिक, महिला,युवती व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.