परंडा (प्रतिनिधी) -दि.15 स्वातंत्र्य दिन केवळ ऐतिहासिक घटना नसून तो आपल्या मनात देशप्रेमाची भावना जागवतो असे प्रतिपादन फुले शाहू आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी येथील क्रांती करिअर अकॅडमी परंडा येथे आयोजित केलेल्या 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिनानिमित्त आपल्या व्याख्यानामध्ये व्यक्त केले.
तेकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉ. शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी क्रांति करीअर अकॅडमीचे संस्थापक पांडुरंग कोकणे व फिजिकल ट्रेनर दीपक ओव्हाळ, नागनाथ कोकणे, या महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक विभुते यांची उपस्थिती होती. यावेळी अकॅडमीचा विद्यार्थी कृष्णा पोपळे याची नुकतीच पुणे येथे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचा डॉ.शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी करिअर अकॅडमी मध्ये उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी म्हटले की तुम्ही देश सेवा करण्यासाठी तुम्ही हे प्रशिक्षण घेत आहात तेव्हा प्रामाणिकपणे आपण आपल्या देशासाठी अभ्यास करून प्रशिक्षण घेऊन आपले जीवन यशस्वी करावे. याप्रसंगी संचालक पांडुरंग कोकणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतांमध्ये क्रांतिकारी अकॅडमी चा वृत्तांत नमूद केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन फिजिकल ट्रेनर दीपक ओव्हाळ यांनी केले.तर आभार पांडुरंग कोकणे यांनी मानले. यावेळी अकॅडमीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.