परंडा (प्रतिनिधी) - लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आज तातुक्यातील मौजे डोमगाव या ठिकाणी 15 ऑगस्ट भारतीय स्वतंत्र दिवस मोठ्या आनंद उत्सवात साजरा करण्यात आला. तसेच 1 ऑगस्ट 2024 रोजी उच्च न्यायालयाने दिलेला अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण केल्याने केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयाबद्दल जिल्हा परिषद शाळा डोमगाव व कल्याण सागर माध्यमिक विद्यालय डोमगाव या ठिकाणी शालेय विद्यार्थीयांना पेढे व बिस्कीट वाटून आनंद उत्सव साजरा केला.

यावेळी लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष राजश्री चव्हण, डोमगावचे शाखा अध्यक्ष तुकाराम शेंडगे, राष्ट्रवादीचे नेते बाबुराव काळे सर, उस्मानाबाद जिल्हा फेडरेशनचे संचालक बापु मिस्किन अशोक चव्हाण, शिवाजी चव्हाण, लक्ष्मण गायकवाड, रामचंद्र चव्हाण, अशोक पाटोळे, सोमा गायकवाड, नाना धेंडे, समाधान जगताप, सोमनाथ आप्पा साबळे, सहदेव खैरे, अजित साबळे, बबन काळे, विनोद चव्हाण, तात्यासाहेब, काकासाहेब चव्हाण, विमल चव्हाण, विजय चव्हाण, सार्थक चव्हाण, अविनाश चव्हाण, यांच्यासह गावातील, प्रतिष्ठित मंडळी, शैक्षणिक राजकीय,सामाजिक  व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 
Top