धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत आहे. श्री मेघ पाटील पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून  मुंबईच्या प्रसिद्ध कॉऊन्सेलर आणि सिने आर्टिस्ट निश्रीनने दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी कॉलेज मध्ये येऊन संवाद साधला आणि संपूर्ण दिवस त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद कौशल्य करून, परदेशातील शिक्षणाच्या व नोकरी संधी बद्दल प्रशिक्षण दिले. 

यामुळे विद्यार्थ्यांना मुलाखत देण्यासाठी व तसेच परदेशातील शिक्षण व नोकरी मिळवण्यासाठी सविस्तर माहिती प्राप्त झाली. या माहितीपूर्ण संवाद कौशल्यावर आधारित कार्यक्रमामुळे  विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. निश्रीन यांनी रेडिओ  94.3 एफएमवर निर्माता आणि प्रोग्रामर म्हणून काम केले आहे. तसेच त्या इंग्रजी भाषिक प्रेक्षकांसाठी ते चित्रपट आणि माहितीपटाचे सबटायटल्स बनवतात. गेल्या वर्षभरातच त्यांनी  बारावी फेल, डंकी आणि वेडिंग डॉट कॉम  च्या दिग्दर्शक आणि टीमसोबत काम केले आहे. 

लक्झरी आणि रिटेल उद्योग साठी त्या कन्सल्टन्ट म्हणून काम पाहत आहेत. विदयार्थ्यांना त्यांनी संवाद कौशल्य बद्दलचे महत्व, त्याचा उपयोग, बॉडी लँगवेज, ग्रुप डिस्कशन बद्दलची महत्वपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमास जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने असे म्हणाले कि, महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामंकित व्यक्तींना आमंत्रित करून विद्यार्थ्या सोबत संवाद घडवून आणत आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांची करिअर ची दिशा मिळेल.  तेरणा ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. पदमसिंह पाटील साहेब , संस्थेचे विश्वस्त आमदारराणाजगजितसिंह  पाटील, मल्हार पाटील, मेघ पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे, सर्व विभाग प्रमुख  यांनी प्रशिक्षक यांनी प्रशिक्षणार्थी यांचे कौतुक केले.

 
Top