भूम (प्रतिनिधी)-  आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ .तानाजी सावंत यांनी निवडणूकचे रणसिंग फुकल्याचे सध्या दिसत आहे. भूम, परंडा, वाशी सह तालुक्यात ग्रामीण भागात सर्वत्र एलईडी सहित प्रचार यंत्रणाचे रथ सध्या पहावयास मिळत आहेत. 

या रथाच्या एलईडी स्क्रीनवर बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांतीच्या विकास कामाचा लेखाजोखा मांडत परंडा विधानसभेच्या सर्वच गावामध्ये दाखवला जात आहे. या मतदारसंघात पालकमंत्री सावंत यांनी हजारो कोटीचा निधी आणला असून ते कामे चालू आहेत. तर काही कामे पूर्णत्वाकडे आहेत असे ग्रामीण भागामध्ये या स्क्रीनच्या माध्यमातून मतदारांना दाखवत आहेत. निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरच पालकमंत्री सावंत यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मागील महिन्यामध्ये सावंत यांनी उशिरा का होईना भूम-परांडा-वाशी या तिन्ही ठिकाणी औद्योगिक क्षेत्र स्थापनपण करण्यासाठी मान्यता देण्यात आली. रस्ते, हॉस्पिटल, एसटी स्टँड आदी कामासाठी सावंत यांनी निधी खेचून आणला असल्याचे दाखवण्यात येत आहे. शिवजल क्रांतीच्या माध्यमातून तिन्ही तालुक्यांमध्ये नदी खोलीकरण करून पाणी आडवा पाणी जिरवा झाल्यामुळे विहीर व बोरला पाणी वाढल्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढीस मदत झाल्याचे या स्क्रीनच्या माध्यमातून मतदारांना दाखवण्यात येतात. शिवसेनेचा हा विकास रथ परंडा मतदारसंघ जनतेपर्यंत जाऊन पोहोचला आहे. याला जनतेमधून प्रतिसाद मिळत असून निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केल्याचे सध्या दिसत आहे.

 
Top