परंडा (प्रतिनिधी) - परंडा येथील शासकीय विश्राम गृह येथे डी.बी.ए समूहाच्या वतीने 104 वी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साक्षत साजरी करण्यात आली.
यावेळी माननीय डी.बी.ए समूह संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे , मनसे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे , छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान संस्थापक अध्यक्ष प्रांणजित गवंडी , प्रहार तालुका अध्यक्ष अप्पासाहेबराव तरटे ,राष्ट्रीय समाज पार्टी तालुका अध्यक्ष मनोज पाटोळे ,मनसे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, मनसे तालुका शहर सचिव बाळासाहेब कांबळे ,खानापूर पोलीस पाटील दिलीप परिहार, ॲड दयानंद धेंडे यांनी सामुदायिक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर दयानंद बनसोडे, आबासाहेब ढवळे, लक्ष्मण शिंदे (देवगाव),दत्तात्रय पाटील( लोहारा ) यांनी विचार मांडले यावेळ,सामाजिक युवराज कसबे,शिवाजी सोनवणे, जिल्हा सचिव नागेश मोरे,श्रीमंत शेळके, राजाभाऊ घोडके,विद्यार्थी मनसे अजित नुसते , तालुका उपाध्यक्ष मनसे रोहित टिकारे , प्रसाद ढेपे (खंडेश्वर वाडी) धर्मराज नरोटे आवार पिंपरी , सचिन ओव्हाळ पिंपरी,चांदणी महिला लक्ष्मीबाई जाधव, अयोध्या काकडे ,आरती बनसोडे, सुषमा बनसोडे, संगीता बनसोडे, संगीत थोरात, सुजाता साळवे, आदी महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होत्या शेवटी उपस्थितांचे आभार दयानंद बनसोडे यांनी मांडले.