ढोकी (प्रतिनिधी)- ढोकी येथील तेरणा साखर कारखाना उच्च माध्य विद्यालयातील इ .11 वी चा विद्यार्थी प्रसाद केंद्रे यांने धाराशिव येथे आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

हातलाई कुस्ती संकूल धाराशिव येथे आयोजित केलेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत 61 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि त्याची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल त्यांचे तेरणा प्रशाला व जुनिअर कॉलेजच्या वतीने अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल प्रशासक विजय घोणसे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रेखाताई कदम,  पी जी वाकुरेसर,  शकील काझी, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष  जीवन कावळे व तसेच सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक संजय पाटील, पर्यवेक्षक एस. पी. लिंगे,  गाठे, लोंढे, वीर, सुनिता पडवळ- पाटील, सुरु या सर्व प्राध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रसाद केंद्रे याचे कौतुक करीत  अभिनंदन केले.

 
Top