धाराशिव (प्रतिनिधी)- 15 ऑगस्ट निमित्त प्रशालेमध्ये गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र ज्ञान मंडळ गेल्या 21 वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून एमकेसील द्वारे इ. 5 वी ते इ. 9 वी च्या शालेय  विद्यार्थ्यांसाठी  01 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत एमकेसील ऑलिम्पियाड मूव्हमेंट'  स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धा परीक्षेमध्ये एम. के. सील आपल्या प्रशालेतील मान्यताप्राप्त अण्णा इन्फोटेक या अधिकृत प्रशिक्षण केंद्रातून इयत्ता 5 वी ते 9 वी मधून एकूण 710 विद्यार्थयांनी सहभाग घेतला होता. या मेगा ई टेस्ट इव्हेंट मध्ये पुढील विद्यार्थ्यांनी आपापल्या इयत्तेमधून जिल्हास्तरावर क्रमांक पटकावला.

इयत्ता 5 वी मधून माढे अन्विता अंबादास   गुण : 128 घेऊन जिल्हास्तर प्रथम क्रमांक पटकाविला बक्षीस म्हणून रोबोटीक कीट 2500 रु. तरकु.चादरे श्रेया श्रीराम  गुण  121 घेऊन जिल्हास्तर द्वितीय क्रमांक. प्राप्त केला बक्षीस  1500 रू.रोबोटीक कीट. तर कु.नागरगोजे सृष्टी अब्बास  गुण 116 जिल्हास्तर तृत्तीय क्रमांक बक्षीस म्हणून रोबोटीक कीट, 1000 रुपयाचे तर इयत्ता 7 वी मधून कु.तांबे भक्ती कैलाश गुण 158 जिल्हास्तर द्वितीय क्रमांक. बक्षीस  1500 रुपयाचे रोबोटीक कीट तर कु.माळी श्रावणी संतोष गुण : 148 जिल्हास्तर त्रितीय क्रमांक बक्षीस रोबोटीक कीट 1000रूपयाचे.

तर इयत्ता 8 वी मधून कु.जाधवर प्राप्ती प्रशांत  गुण 178  जिल्हास्तर प्रथम क्रमांक बक्षीस  2500 रुपयाचे रोबोटीक कीट दिले. तर कु.पडवळ श्रेया शाम गुण 178 जिल्हास्तर द्वितीय क्रमांक.बक्षीस : 1500 रूपयाचे रोबोटीक कीट. तर कु.सावंत अनुष्का महेश गुण 177 जिल्हास्तर तृतीय क्रमांकबक्षीस  1000 रूपयाचे रोबोटीक कीट देण्यास आले. इयत्ता 9 वी मधून बेलदार सारंग पोपट गुण 190 जिल्हास्तर प्रथम क्रमांक बक्षीस 2500 रुपयाचे रोबोटीक कीट. तर कु.पवार श्रावणी जयप्रकाश  गुण 180 जिल्हास्तर द्वितीय क्रमांक पटकावला. बक्षीस 1500 रुपयाचे रोबोटीक कीट तर तृतीय तोडकरी वीरभद्र संतोष  यास गुण  180 जिल्हास्तर त्रितीय क्रमांक बक्षीस 1000 रुपयाचे रोबोटीक कीट.

या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य  नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याद्यापक प्रमोद कदम, उपप्राचार्य संतोष घार्गे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अण्णा इन्फोटेकचे चेअरमन  आदित्य सुधीर पाटील, महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक धनंजय जेवळीकर  व पर्यवेक्षक धनंजय देशमुख, निखीलकुमार गोरे, राजेंद्र जाधव, सुनील कोरडे,  वाय. के. इंगळे व श्रीमती गुंड बी.बी., प्रा. विनोद आंबेवाडीकर यांच्या हस्ते सर्टिफिकेट  व सायन्स रोबोटिक कीट  देऊन सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आदित्य पाठक यांनी केले.

 
Top