तुळजापूर (प्रतिनिधी) -  श्रीतुळजाभवानी मंदीर लगत वभाविकांचो  सर्वाधिक  वर्दळ असणाऱ्या शुक्रवार पेठ  भाग गेली  अनेक वर्षापासून शाषण प्रशाषण पासुन वंचित असल्याने या भागातील नागरिकांनी येथील दशावतार मठात महंत मावजीनाथ महाराज अध्ययते बैठक घेवुन या भागात मुलभुत सुविधा तात्काळ पुरवुन विकास कामे करण्यासाठी श्रीतुळजाभवानी  मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाअधिकारी डाँ सचिन ओम्बासे व आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांना भेटुन निवेदन  देण्याचा निर्णय  झालेल्या  बैठकीत  घेण्यात आला.

शुक्रवार भागातील साळुंके गल्ली,भोसले गल्ली,खडकाळ गल्ली,मंकीवती गल्ली  या भागातील मागासलेपणा दूर व्हावा या भागात विकास कामे व्हावे यासाठी बैठक घेण्यात आली. या  शुक्रवार पेठ भागातील  दगडी पायऱ्यां काढा.  या भागातील विजपुरवठा सतत खंडीत होत असल्याने सौरदिवे बसवावे. मंगळवारी   या भागात भरणारा आठवडा बाज इतर दिवशी भरवा सुरेख स्मृती रेस्ट हाऊस, आठवडा बाजार या ठिकाणी भाविकांच्या गाड्यांसाठी भव्य पार्किंगची व्यवस्था करावी.     

या भागातील  प्राधिकरण अंतर्गत बांधलेले 124 भक्तनिवास या ठिकाणी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल होत असल्यामुळे व नगरपरिषदेच्या सुरेख स्मृती रेस्ट हाऊस व यात्रा मैदान भक्तनिवास हे दोन्ही भक्तनिवास बंद पडलेले असून  मंदिर संस्थांनच्या वतीने  भक्तांसाठी नगर परीषदेच्या यात्रा मैदान भक्त निवास या ठिकाणी सर्व सामान्य भाविकांसाठी अल्प दरातील भक्त निवासा साठी तात्काळ दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात यावा. हुतात्मा चौक ते साळुंके गल्ली पावणारा गणपती रास्ता रुंदीकरण लवकर करण्यात यावा. धाराशिव रोड कन्या शाळा मार्गे साळुंके गल्ली मार्गास मान्यता द्यावी. शुक्रवार पेठ हाडको वाहनतळ भागात भाविकांचे वाहने येणेसाठी  धाराशिव हॉटेल राजपॅलेस जवळ शुक्रवार पेठ कडे जाण्याच्या मार्गावर मोठी कमान उभे करावे म्हणजे भाविक वाहने घेऊन या भागात येतील.

या जिल्हा दूध संघाचे चेअरमन बाळासाहेब शिंदे किशोर गंगणे विश्वासराव भोसले इंद्रजीत साळुंके, बाळासाहेब भोसले, शुभम क्षीरसागर, अण्णासाहेब क्षीरसागर, विजय भोसले शशी नवले, दिवाकर शेळके, विजयकुमार नवले, कल्याण भोसले, नगरसेवक माऊली भोसले, रत्नदीप भोसले, लखन पेंदे महेश अमृतराव दत्ता सोमाजी किरण अमृतराव दत्ता क्षिरसागर अक्षय करडे यांच्यासह परिसरातील 200ते300 नागरिक उपस्थितीत होते.

 
Top