धाराशिव  (प्रतिनिधी) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव जिल्हा लोकसभा मतदार संघ युवासेना (युवती) विस्तारकपदी कु.स्वाती शंकरराव बोरकर यांची निवड करण्यात आली आहे.  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात युवासेना पदाधिकारी व युवती सेना विस्तारक निवडी जाहीर केल्या आहेत. यामध्ये स्वाती शंकरराव बोरकर यांना धाराशिव जिल्ह्यातून संधी मिळाली असून या निवडीचे कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघांतील अकरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात युवासेना (युवती) वाढविण्यासाठी कु. स्वाती शंकरराव बोरकर यांची युवासेना युवती विस्तारक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. कु.स्वाती ह्या शिवसेना पक्षाशी ते एकनिष्ठ असलेले प्रसिद्ध उद्योजक शंकरराव बोरकर यांच्या कन्या आहेत. शंकरराव बोरकर यांनी वाशी तालुक्यातील इंदापूर येथे नृसिंह सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली होती. तेव्हा शिवसेनेच्या नेतृत्त्वाचा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना म्हणून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शंकरराव बोरकर यांचे कौतुक केले होते. त्यामुळे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांशी बोरकर यांचे जवळीकीचे नाते आहे. उद्योग सांभाळून शिवसेनेचे काम करत असताना आता बोरकर कुटुंबातील आणखी एक व्यक्ती शिवसेनेत सक्रिय झाली आहे, ती म्हणजे शंकरराव बोरकर यांच्या कन्या कु.स्वाती बोरकर. त्यांच्या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

 
Top