तुळजापूर (प्रतिनिधी) - सोलापुर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे भुसंपादन होणाऱ्या जमीनी पैकी मौजे तडवळा ता. तुळजापूर येथील आवार्ड मध्ये प्रचंड चुका होवुन यात शेतकऱ्यांना मोठा अर्थिक फटका बसला आहे. झालेल्या चुका दुरुस्त करुन सुधारीत पुरवणी अवार्ड जाहिर करुन वाढीव मावेजा द्यावा अशी मागणी मौजे तडवळा ता. तुळजापूर येथील रेल्वे भुसंपादन मधील सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी  भूसंपादन अधिकारी संजय ढवळे यांना निवेदन देवुन केली आहे. विकास तिर्थक्षेञचा उद्धस्त माञ बळीराजा होत असल्याने या प्रकरणाची तात्काळ केंद्र राज्य खासदार आमदार यांनी लक्ष घालुन शेतकऱ्यांना समाधानकारक मावेजा देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्ग लवकर पूर्ण न होण्यास भूसंपादन अधिकारी वर्गाचा बेजबाबदार कारभार असल्याचे बोलले जात आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, मौजे तडवळा ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील सर्व शेतकरी, भुधारक रहिवाशी असुन सदर रेल्वे मार्गासाठी भुसंपादन होणाऱ्या सर्व शेतकरी, भुधारक यांना तलाठी कार्यालयकडून प्राप्त झालेल्या नोटीस मध्ये वेगवेगळया शेतकरी, भुधारकांच्या मावेजामध्ये खुप मोठया प्रमाणात तफावत असुन, आम्ही सर्व शेतकऱ्यामध्ये भुधारक रहिवाशी मध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे.

रेल्वेसाठी भुसंपादन होत असलेल्या जमीनीतील शेतजमीन यापुर्वी सोलापूर- धाराशिव-लातुर या बायपास मार्गात ही भुसंपादन झालेली असुन यातील बहुतांशी शेतकरी भुमीहीन होणार आहे. तसेच सदर बायपास मार्गालगत असलेल्या जमीनी ही रेल्वे मार्गासाठी भुसंपादन होत आहे. त्यामुळे भुसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांकडील उत्पादनाचा मार्ग बंद होवून भविष्यात उपासमारीची वेळ येऊ शकते. या निवेदनावर मोजे तडवळा येथील रेल्वे संपादीत शेतकरी व ग्रामस्थांचा स्वाक्षरी आहेत.

 
Top