भूम (प्रतिनिधी)- भूम येथील तहसील कार्यालयात समोरील प्राणागणात आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. शासन सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी आहे .मधल्या काळात अनेक गोष्टीमुळे थेट संपर्क साधण्यात अडचणी आल्या आता जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्यांच्या प्रश्नांची तात्काळ सुरू केली जाईल .शक्य असणाऱ्या समस्या लगेच जागेवर दूर केल्या जातील. तर उर्वरित तक्रारीचा निपटारा 15 दिवसाच्या आत करण्याचे आदेश पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिले तक्रारीचे स्वरूप आणि संख्या पाहता जनता दरबारात पालकमंत्र्यांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली.
भूम येथील तहसील कार्यालयात पालकमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराच्या आयोजन करण्यात आले होते. या दरबाराला जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्वच विभागाचे विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. सकाळी दहा वाजता सुरू झालेला हा दरबार सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. या दरबारात 408 तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 600 तक्रारीचा निफ्टारा करण्यात आला .शेतकऱ्याच्या बाबतीत मागील तीन वर्षापासून वीज जोडणीचे शुल्क भरूनही वीज जोडणी मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या ,भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी होत नाही, कृषी,पोलीस नगरपरिषद,पंचायत समिती,महावितरण,एसटी महामंडळ,तहसील कार्यालय, बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग ,तालुक्यातील सर्व प्रमुख बँक,आरोग्य विभाग,उपविभागीय अधिकारी कार्यालय,भूसंपादन विभाग, आदी कार्यालयांच्या तक्रारीचा निपटारा करीत केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अमोल बजावणी वरून अधिकाऱ्यांची खरडपट्टी पालकमंत्री सावंत यांनी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, बाळासाहेब क्षीरसागर, बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर, दत्तात्रय मोहिते, गौतम लटके, दत्ता साळुंखे, बालाजी गुंजाळ, युवराज हुंबे, समाधान सातव, दत्ता मोहिते, विशाल ढगे, निलेश शेळवणे, जयसिंग गोफणे आदी यावेळी उपस्थित होते.