भूम (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या आदेशाने आज पासून भूम आगारातून विशेष बस सेवा सुरू करण्यात आली. 

नुकताच भूम येथे पार पडलेला पालकमंत्री सावंत यांंचा जनता दरबार यामध्ये ग्रामीण भागातील लोकांनी तीर्थ ठिकाणी जाण्याची गैरसोय होत असल्याने आम्हाला तीर्थक्षेत्री जाण्यासाठी बसेसची व्यवस्था व्हावी अशी मागणी केली होती. पालकमंत्री तानाजी सावंत यांनी एसटी महामंडळात तात्काळ आदेश देऊन एसटी बसेस सुरू करण्याचे आदेशित केले. त्यामध्ये प्रामुख्याने भूम ते भगवानगड, भूम ते आळंदी, भूम ते अक्कलकोट, या अतिरिक्त बसेस जनतेच्या सेवेत दिल्याबद्दल ग्रामीण भागातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  या बसच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंगेकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष समाधान  सातव, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विशाल ढगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवराज तांबे, भूम तालुका महिला आघाडी अश्विनी भगत, महिला आघाडी शहर प्रमुख ज्योती बाराते, उप तालुका प्रमुख महिला आघाडी सविता भोरे, ओबीसी सेल अध्यक्ष राणी यादव, सोशल मीडिया भूम तालुका प्रमुखमुकेश भगत पाटील, सर्व चालक व वाहक उपस्थित होते.


 
Top