धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हय़ात ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरु आहे.या तपासणीवेळी जिल्हयातील राजकीय प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

जिल्हयात 1 ऑगस्टपासून  ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सची प्रथमस्तरीय तपासणी सुरु करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार काम सुरु आहे.त्या अनुषंगाने धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथील शासकीय गोदामात ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशीन्सची प्रथमस्तरीय तपासणी सुरु करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्ष तसेच त्यांचे प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्याबाबतचे निर्देश आहेत. त्यानुसार राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी सकाळी 10 वा उपस्थित राहून ईव्हीएम - व्हीव्हीपॅट मशीनविषयी माहिती जाणून घ्यावी.

काही प्रश्न वा शंका असल्यास त्याचे निराकरण भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे अभियंते यांच्याकडून करुन घ्यावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

 
Top