भूम (प्रतिनिधी)- भूम आगारात चालक म्हणून सेवानिवृत्त झालेले मधुकर तात्याबा चोबे (वय 69) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरी निधन झाले. सलग 11 वर्षे विना अपघात सेवा त्यांनी दिली होती. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन विवाहित मुले, सुना व नातवंडे आहेत. येथील जिल्हा परिषद शिक्षक राजेश चोबे यांचे ते वडील होते. त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी कांदलगाव ता. परांडा येथे करण्यात आला.