धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदारसंघात रुपामाता उद्योग समुहाचे संस्थापक अँड. व्यंकटराव गुंड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शेतकरी व युवा संवाद अभियानातून गावभेट व जनसंवाद दौरा सुरू केला आहे.
मागील पाच दिवसात चिवरी (उमरगा), बसवंतवाडी, चिंचोली,कुंन्सावळी, बोळेगाव,तिर्थ(बु.), बिजनवाडी, मौजे बाभळगाव, शिरगापूर, मौजे बोरगाव (राजे), मौजे बोरखेडा, काक्रंबा,कार्ला इ. गावातील शेतकरी युवक महिला बचत गटातील सदस्या यांच्याशी संवाद साधून ऊस व दुध प्रश्नांसह रोजगार निर्मिती, आरोग्य,रस्ते,वीज,पाणी या ज्वलंत समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. दिग्विजय इंडस्ट्रीज चे चेअरमन विक्रम सुरवसे, उद्योग समुहातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा दौऱ्यात प्रामुख्याने सहभागी असतात.