नळदुर्ग (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य नगरपालिका संवर्ग अधिकारी संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. 29 ऑगस्ट पासुन पुकारलेल्या बेमुदत संपाला पाठिंबा देत नळदुर्ग येथील नगरपालिकेचे सर्व कर्मचारी दि. 29 ऑगस्ट पासुन बेमुदत संपावर गेले आहेत.त्यामुळे नगरपालिकेतील सर्व कामकाज बंद पडले होते.

बेमुदत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. यामध्ये जुनी पेन्शन मिळावी, आश्वासित प्रगती योजना लागु करावी, सहाय्य्क अनुदान एक महिना आगाऊ देणे, सातवा वेतन व महागाई फरक अनुदान मिळावे, सफाई कामगारांना हक्काचे घरे मिळावेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, सर्वसाधारण बदल्यांमधील जाचक अटी रद्द कराव्यात या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचा समावेश आहे. संपावर गेलेले कर्मचारी नगरपालिकेच्या आवारात ठिय्या मांडुन बसले होते. यामध्ये अजय काकडे, वैभव चिंचोले, दिक्षा शिरसाट, खलील शेख, तानाजी गायकवाड, दस्तगीर जागीरदार, व्ही. बी. खंदारे, सतीश आखाडे, सुरज काळे, ज्योती बचाटे, शहाजी येडगे, आनंद खारवे, अन्नाराव जाधव, भीमसेन भोसले, प्रविण चव्हाण, नितीन पवार सुरेश भालेराव, फुलचंद सुरवसे, मुकुंद भुमकर, खंडु नागणे व सुशांत डुकरे यांचा समावेश आहे.

 
Top