धाराशिव  (प्रतिनिधी) - कलकत्ता येथील येथील महिला डॉक्टर सोबत केलेला अत्याचार व खून ही अतिशय घृणास्पद व अमानुष प्रकार आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या आंदोलनास इंडियन मेडिकल असोसीएशन धाराशिव, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना व वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्यावतीने काळ्या फिती लावून कामकाज करीत पाठिंबा दिला आहे. तसेच संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथील आर जी कर मेडिकल कॉलेज येथे महिला डॉक्टर सोबत केलेला अत्याचार व खून हा अतिशय घृणास्पद व अमानुष प्रकार आहे. या घटनेच्या विरोधात डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. 

या अत्याचाराच्या निषेधार्थ मार्ग संघटनेने पुकारलेले आंदोलन हे अतिशय गांभीर्यपूर्वक दखल घेण्यासारखे असून घडलेल्या घटनेचा महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना निश्चित करीत असून काळ्या फिती लावून कामकाज करीत आहेत.  या निवेदनावर डॉ.सचिन देशमुख, डॉ.स्मिता गवळी, डॉ.आदिनाथ राजगुरु, डॉ.चंचला बोडके, डॉ.निता पौळ, डॉ.कौशल्या राजगुरु, डॉ.ज्योती कानडे, डॉ.मिलिंद पौळ, डॉ.सुधीर मुळे, डॉ.विशाल वडगावकर, डॉ.सुश्रुत डंबळ, डॉ.विरेंद्र गवळी, डॉ.सुजितकुमार रणदिवे, डॉ.विनोद महिंद्रकर, डॉ.महेश गुरव, डॉ.महेश पाटील, डॉ.दत्ता चौरे, डॉ.शिवानंद देवपूजे, डॉ.प्रवीण कुदळे, डॉ.भिमदीप टोपे, डॉ.रोहन आर्वीकर, डॉ.प्रतीक सुर्यवंशी डॉ.श्रध्दा मुळे,यांच्या सह्या आहेत.

 
Top