धाराशिव (प्रतिनिधी) - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरातील जल व भूमी व्यवस्थापन विभाग आणि जल समृद्धी प्रतिष्ठाण, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळा शनिवार, दिनांक 17-08-2024 रोजी सकाळी 11:00 वाजता विद्यापीठ उपपरिसरातील सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील असलेली पाण्याची परिस्थिती पाहता मराठवाडयास अपेक्षित असलेले हक्काचे पाणी मिळणे आवश्यक आहे. मराठवाडा हा कायम स्वरुपी पाण्याचा कमतरतेचा भाग असल्यामुळे अनेक शासकीय योजना शासनाने प्रस्तावित केलेल्या आहेत तसेच 21 टीम. एम. सी. पाणी मराठवाडयाला मिळणे अपेक्षित आहे. या सर्व बाबींवर चर्चा होणे, जन जागृतीसाठी आवश्यक ठरते. या सर्व घटकांचा विचार करुन विद्यापीठ उपपरिसरातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी, परिसरातील महाविद्यालयीन प्राध्यापक तसेच धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक व जल क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा व जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास जिल्हयातील शेतकरी, सामाजिक व जल क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असे आवाहन जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डाॅ. नितीन पाटील व संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दिक्षित यांनी केले आहे.