धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील रुपामाता अर्बन को. आँपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीने ठेवीदार व ग्राहकांची विश्वासार्हता संपादित करून सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीसाठी दिपस्तंभाप्रमाणे कार्य केले. त्यामुळे पतसंस्थेला चांगली दिशा देऊन दिशादर्शक बनण्याचे कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्या वतीने तब्बल चौथ्यांदा सहकार क्षेत्रातील मानाचा व प्रतिष्ठित असा राज्यस्तरीय 2023-24 चा दीपस्तंभ पुरस्कार हैदराबाद या ठिकाणी कार्यक्रमात कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे आणि पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
संस्थेचे विश्वस्थ अँड. व्यंकट गुंड, शंकर गाडे व मुख्यकार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले, विभाग प्रमुख खोत सागर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
धाराशिव जिल्ह्यातील सहकार क्षेत्र मोडीत निघत असताना रुपामाता ने मराठवाड्या सह धाराशिव जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. रुपामाता उद्योग समुहाचे गुळ कारखाने, डेअरी शिक्षण संस्था इत्यादीच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा दिपस्तंभ पुरस्कार हा सन्मान अतिशय महत्त्वाचा मानला जातो. दिपस्तंभ पुरस्काराच्या यशा बद्दल संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, खातेदार, सर्व कर्मचारी वर्ग हितचिंतक यांचे हे यश आहे असे ॲड. व्यंकट गुंड यांनी सांगितले.