तेर (प्रतिनिधी)- गरीबीची जाणीव ठेऊन प्रचंड अभ्यास करून धाराशिव तालुक्यातील काजळा येथील आश्लेषा हाजगुडे या शेतकरी कन्येने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.
धाराशिव तालुक्यातील काजळा येथील आश्लेषा हाजगुडे हीचे प्राथमिक शिक्षण काजळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण काजळा येथील रामानंद हायस्कूल येथे झाले. तर पदवीचे शिक्षण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथे झाले. लहानपणापासून अभ्यासात हुशार असणारी आश्लेषा हाजगुडे हीने 2023 पासून स्पर्धा परीक्षांची तयारी चालू केली. कसल्याही प्रकारचे खाजगी क्लासेस लावले नाहीत. घरीच अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात आश्लेषा हाजगुडे हिची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. तिचे वडील शेती व्यवसाय करतात. त्यानी आश्लेषा हाजगुडे हिच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. या यशाबद्दल आश्लेषा हाजगुडे हीचे अभिनंदन केले जात आहे.