धाराशिव  (प्रतिनिधी)-  भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास कोळगे यांनी धाराशिव -कळंब विधानसभेची  उमेदवारी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  यांच्याकडे निवेदनाद्वारे आज बुधवारी ( दि 21) राेजी मुंबईत  केली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांची उपस्थिती होती श्री कोळगे यांनी आज बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात श्री बावनकुळे यांची भेट घेतली दरम्यान भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांची भेट घेऊन आपणास उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली यावेळी श्री भेगडे यांनीही रामदास कोळगे यांना धाराशिव- कळंब  विधानसभेचे उमेदवारी देण्यात यावी अशी शिफारस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना केली यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळंके सरचिटणीस संदीप गिड्डे-पाटील प्रदेश समन्वयक राहुल भोसले यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची  उपस्थिती होती. 


 
Top