धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांचा राज्य शासनाने प्रशंसा पत्र देत सन्मान केला आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रूजू झालेल्या उमेदवार यांची संख्या सर्वात जास्त असून, ही योजना अत्यंत प्रभावीपणे धाराशिव जिल्ह्यात राबविली गेली. त्यामुळे सन्मान करण्यात आला आहे. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी हे प्रशंसा पत्र जिल्हाधिकारी, सीईओ यांना दिले आहे.