तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नव्याने बांधकाम होत असलेल्या बस स्थानकाला सोमवार दि.12 ऑगस्ट रोजी भेट देवुन कामाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर संबंधित कंञाटदार, अधिकारी वर्गाची बैठक घेतल्यानंतर बसस्थानक काम शारदीय नवराञोत्सवापुर्वी पुर्ण करावे. असे सांगून सप्टेंबर महिन्यात बसस्थानकाचे उद्घाटन होईल असे संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. 

यावेळी त्यांनी  महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रउत्सव  दि 3 आक्टोंबरला घटस्थापनेन प्रारंभ  होत असल्याने  भाविक, शहरवासियांच्या दृष्टी कोणातुन शहरातील मध्यवर्ती असणारे बसस्थानक हे लवकर सुरु व्हावे. या दृष्टी कोणातुन संबंधीत काँट्रक्ट, एस. टी. महामंडळाचे संभाजीनगर, धाराशीवचे सर्व अधिकारी यांची सर्कीट हाऊस  येथे बैठक घेवुन सुचना दिली. तत्पुर्वी  सदरील होत असलेल्या कामाची पहाणी समक्ष जागेवरती जाऊन केली. पुढील महिण्यापर्यंत लवकरात लवकर बस स्थानक हे भाविकांसाठी सुरु व्हावे बाबत सुचना दिल्या. तथा कामाच्या दर्जा बाबतही सांगीतले.

बैठकीस नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नरेश अमृतराव, लखन पेंदे, सचिन पाटील, नरसिंग बोदले, राजेश्वर कदम, राजेश शिंदे, माऊली भोसले, धैर्यशील दरेकर, रत्नदीप भोसले, आण्णाप्पा पवार आदी बैठकीस उपस्थित होते.

 
Top