तुळजापूर (प्रतिनिधी)- सोलापूर येथील वुडलैंड फर्निचरचे मालक पद्मकुमार रमेशचंद्र मेहता यांच्या वतीने वडील कै. मेहता गुरुजी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. 3 तुळजापूर खुर्द या शाळेत इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाची सलग 25 वर्षांपासून भेट देऊन वाटप केले जात आहे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही न. प. शाळेतील इयत्ता पहिलीतील 95 विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप माजी सैनिक अंकुश भगवानराव भोजने यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे, माजी शिक्षण सभापती मंजुषाताई देशमाने, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लक्ष्मीताई रणजीत भोजने, मेजर गणेश जनार्धन बागल, माजी सैनिक वैभव महाडिक, पद्म कुमार मेहता, स्मृती मेहता,गोविंद डोंगरे, वंदनाताई नन्नवरे, शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मोटे, सतीश यादव, निर्मला कुलकर्णी,अशोक शेंडगे ,जालिंदर राऊत, शरद कोळगे, पुष्पा काळे, वैशाली गोमारे, अनिलतात्या राठोड, अतुल काकडे, दिगंबर थिटे, रणजीत नाईकवाडी तसेच कल्पना व्हटकर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.