धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्यातील देवस्थान व इनाम वर्ग-2 जमिनी रेडीरेकनर दराच्या 5 टक्के नजराणा भरून वर्ग-1 करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याची बाब अतिशय स्वागताहार्य असून अनेक दिवसापासून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच सातत्याच्या पाठपुराव्याने हा विषय मार्गी लावण्यात यश आल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.  

दि. 30 जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह झालेल्या बैठकीत यास तत्वतः मान्यता देण्यात आली होती. सदरील बैठकीस आ. राणाजगजितसिंह पाटील देखील उपस्थित होते. आजच्या मंत्रीमंडळ  बैठकीत  रेडीरेकनर दराच्या 5 टक्के नजराणा भरून या वर्ग -2 जमिनी वर्ग 1 करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य सरकारने जिल्ह्यातील इनाम व देवस्थानच्या जमिनी नियमानुकूल करण्यासंदर्भात घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी आणि प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे. रेडिरेकन दराच्या 5 % नजराणा भरून वर्ग 2 जमिनी वर्ग 1 मध्ये परावर्तित करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय अतिशय आनंददायी  असून  जिल्हावासीयांच्या वतीने महायुती सरकारचे आभार मानले.

 
Top