धाराशिव (प्रतिनिधी)-रविवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेच्या धाराशिव शाखेचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक राजन लाखे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिक्षण उपसंचालक डॉ गणपतराव मोरे, डायटचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख केंद्रीय संस्थेचे सदस्य विनोद वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव शाखेचे अध्यक्ष युवराज नळे असणार आहेत. तरी साहित्यिक व साहित्य रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन कार्यवाह समाधान शिकेतोड, सल्लागार मंडळ सदस्य डॉ. अभय शहापूरकर, राजेंद्र अत्रे, डॉ. प्रशांत चौधरी कार्याध्यक्ष हनुमंत पडवळ, उपाध्यक्ष भागवत घेवारे, डी. के. कुलकर्णी, डॉ. रुपेशकुमार जावळे, डॉ. सरोजिनी राऊत, सुनिता गुंजाळ कवडे, प्रा. विद्या देशमुख, सुरेश शेळके इत्यादींनी या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. याप्रसंगी बाळासाहेब त्याचे प्रदर्शन देखील मांडण्यात येणार आहे.