धाराशिव (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी या गावातील  ग्रामस्थांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला जिव्हाळ्याचा विषय मार्गी लागत असून तामलवाडी ते वडगाव काटी या 7 कि. मी.च्या रस्त्याला 10 वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसह 9 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना दिली.

सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ते वडगाव काटी या गावास जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून ग्रामस्थांना ये जा करणे अत्यंत अडचणीचे होत होते. हा रस्ता व्हावा ही येथील ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. रस्त्याची दुरवस्था व मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या होत्या. सदर रस्ता हा सिमेंट काँक्रिट चा करण्यात येणार असून यासाठी रू. 9 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

मागील अनेक वर्षाच्या तामलवाडी ते वडगाव काटी या रस्त्याच्या मागणीला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून मंजुरी मिळवून देण्यात आली आहे. ग्रामस्थांची अडचण सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, माजी जि.प.सदस्य राजकुमार पाटील, नरसिंग धावणे, धनाजी धावणे,लक्ष्मण शेंडगे,हनुमंत गवळी,नाना कदम, आप्पा धावणे,शाहू साखरे,मनोज धावणे,महेश धावणे,स्वप्नील सपाटे, योगेश धावणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


राज्यातील कला- विज्ञान- वाणिज्य बरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये राज्य सरकारच्या केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे  उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि ज्या विद्यार्थिनींच्या पालकांचे आठ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असेल अशा सर्व विद्यार्थिनींच्या 100 टक्के शुल्काचा परतावा राज्य सरकार करणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून ही योजना लागू केली असून या आधी प्रवेशित विद्यार्थिनींना देखील याचा लाभ होणार आहे. राज्यातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मात्र आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागणाऱ्या विद्यार्थिनींना याचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

 
Top