तेर (प्रतिनिधी)-सुनंदा जगताप यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद  आहे असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.धाराशिव तालुक्यातील तेर येथे कै.डॉ.चंद्रकलादेवी पाटील स्मृती पुरस्कार वितरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील यांनी प्रतिपादन केले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.बेदरे होते. तर धाराशिव पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, श्री संत गोरोबा काका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्माकर फंड, तेर सोसायटीचे माजी चेअरमन व्यंकटराव माळी, विजयकुमार लाड, तेरचे सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, तेर सोसायटीचे चेअरमन सतिष कदम, तेरणा विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड, महाराष्ट्र संत विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एस.पाटील,स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्रवीण साळुंके, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, माजी उपसरपंच मज्जित मनियार, स्वयंम शिक्षण प्रयोगच्या संवाद सहाय्यक जयश्री माळी, उमेदच्या प्रेरीका पूजा चव्हाण, भाग्यश्री भक्ते, वैशाली देवकते,जोती नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लातूर येथील वृक्षसखी व सामाजसेविका सुनंदा जगताप यांना कै.चंद्रकलादेवी पाटील स्मृती पुरस्कार हा स्मृतीचिन्ह, मानपत्र देऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक नरहरी बडवे यांनी केले. यावेळी कै.चंद्रकलादेवी पाटील स्मृती पुरस्कार प्राप्त सुनंदा जगताप यांनी वृक्षावर कविता सादर करून उपस्थितांची मने वेधून घेतली. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन नवनाथ पांचाळ यांनी केले. तर मानपत्राचे वाचन एस.यू.गोडगे यांनी केले. आभार नवनाथ पांचाळ यांनी मानले. यावेळी डॉ गुरूप्रसाद चिवटे, गोरख माळी,रामा कोळी, संजय लोमटे, आश्रूबा पाडूळे, अविनाश पाडुळे, एजाज बागवान, मधुकर पवार, कामधेनू देशमाने व विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top