धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हास्तर ज्युनिअर ॲथलेटिक्स(मैदानी) अजिंक्यपद स्पर्धा व राज्य निवड चाचणी 18 व 20 वर्षाखालील मुले स्पर्धा श्री श्री रविशंकर विद्यामंदिर लातूर रोड उमरगा येथे दि.17 ऑगस्ट 2024 घेण्यात आली. त्यामध्ये रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे दोन खेळाडू राज्यस्तरी स्पर्धेसाठी पात्र झालेत. भरत गोविंद माळी (भालाफेक), ओंकार व्यंकट माळी (थाळीफेक) या दोन्ही विद्यार्थ्यांचे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड, जि.प. चे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, शाळेचे प्राचार्य सुरेश मनसुळे, मुख्याध्यापक सूर्यवंशी आर. डी. सर्व शिक्षक वृंद, क्रीडा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.