तुळजापूर (प्रतिनिधी)- बदलापूर येथील शाळेतील साडे तीन वर्षीय दोन मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधमास तात्काळ फाशीची देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी तहसिलदार मार्फत राज्यपाल यांना निवेदन देवुन करण्यात आली.
राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे कि, महाराष्ट्र राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढल्याने देशात महाराष्ट्र गुन्हेगारीत नंबर 1 वर आले आहे. यात आपण लक्ष घालावे. तसेच बदलांपूर येथील चिमुकलीवर लैगिंक अत्याचार झालेल्या आरोपीस तात्काळ फाशी देण्याची मागणी केली. हे निवेदन तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, युवती प्रदेशाध्यक्ष सलगर, तालुका उपाध्यक्ष रुबाब पठाण, तालुका अल्पसंख्यांक, विधानसभा तालुका अध्यक्ष इनामदार, धनंजय पाटील, रोहित देशमुख, अनिल कदम, गोविंद देवकर, रमेश मुळे, समाधान दातोडे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.